विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेडः आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत यासह विविध निवडणुकीत भाजपाला मोठ्या फरकाने विजयी करून काँग्रेसमुक्त विधानसभा मतदार संघ घडविण्यासाठी पुढाकार घेऊया असे प्रतिपादन यवतमाळ – पुसद जिल्हा समन्वयक तथा पश्चिम विदर्भ प्रमुख सदस्य नोंदणी अभियान चे नितीन भुतडा यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आज दि १५ रोजी राजस्थानी भवन येथे कार्यकर्त्यांना आवाहन केले.यावेळी मंचावर जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे ,आमदार किसनराव वानखेडे, माजी आ. नामदेव ससाने, बळवंतराव नाईक, दीपक आडे, सविता पाचकोरे, जितेंद्र पवार, दत्तदिगंबर वानखेडे, सुदर्शन पाटील परमानंद कदम दत्त दिगंबर वानखेडे ज्ञानेश्वर वानखेडे रवी देशमुख प्रकाश जाधव सरपंच धानोरा संजय काळे अनिल गोबे . आदित्य माने, अस्मिता आढाव, दिलीप सुरते, यांच्यासह उमरखेड व महागाव तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना नितीन भुतडा यांनी विधानसभा निवडणूकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बिकट परिस्थिती समोर असताना अनेक ठिकाणचे कार्यकर्ते लढाई जिंकणे एवढे सोपे नाही असे समजून संभ्रमावस्थेत होते. पक्षाने मोठे केलेले पक्षाचे काही नेते विरोधात काम करत होते असे असताना कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने प्रचार कार्यात अहोरात्र मेहनत घेऊनपक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसनराव वानखेडे यांना निवडून आणले.पक्षापेक्षा मोठा कोणीही नसूनसमर्पित भावनेने पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता असून निवडणुकीतील विजयाचा शिल्पकार कोणताही नेता नसून गावागावातील पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता हाच विजयाचा खरा शिल्पकार असल्याचे भूतडा म्हणाले व विधानसभेच्या निवडणुकीतील यशाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी व सहकार क्षेत्रात चंचू प्रवेश करण्यासाठी इतर पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांनाही पक्षात समाविष्ट करून आगामी जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीत भाजपाला एक हाती सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसमुक्त विधानसभा मतदारसंघ करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला . यावेळी उमरखेड व महागाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे संचालन श्रीधर पाटील देवसरकर यांनी केले .