अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, पातूर
पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व आयुर्वेद रुग्णालय कर्मचाऱ्यांचे वेतन सहा महिन्यापासून झाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले असून महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनाकडून या बाबीचे कुठलीच दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवार पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते यामध्ये थकित वेतन व महागाई भत्ता तसेच भविष्य निर्वाह निधी संबंधित कार्यालयात भरणा करण्यात यावा याकरिता वेळोवेळी व्यवस्थापनास विनंती करून सुद्धा कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रकारचे व्यवस्थापनाकडून सहकार्य मिळाले नाही तसेच कर्मचारी वर्गाचे मागील थकित वेतन व थकित महागाई भत्ता एकरकमी देऊन भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करण्यात यावी ही सुद्धा केली नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता परंतु या संस्थेचे मार्गदर्शक परभणीचे आमदार डॉक्टर राहूल पाटील यांनी शनिवारी या काम बंद आंदोलनाला भेट दिली आणि सदर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली आणि सदर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सकारात्मक चर्चा केली.
त्यामुळे सदर चे काम बंद आंदोलन ग्रामीण आयुर्वेद
महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तूर्त स्थगित केले होते. त्यानंतर एका महिन्याचे वेतन व्यवस्थापनाने केले आहे.
मात्र इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारपासून आंदोलन सुरू केले असल्याची माहिती मिळाली आहे या महाविद्यालयाचे परिसरातच काम बंद आंदोलन सुरू केले होते या आंदोलनामध्ये या संघटनेचे अध्यक्ष गणेश मानकर, श्रीकृष्ण राऊत, प्रशांत निकम,मनवरखान, संजय इंगळे, गणेश राठोड, मनोहर उगले,माणिक खिल्लारे, दिलीप बगाडे, निलेश चिंचोळकर सुधीर चव्हाण, रमेश बँड, अनिल सपकाळ, सूनील दाते,संदीप गिर्हे, अब्दुल फय्याज अब्दुल रहुफ, फुलसींग राठोड, गजानन पाटील, प्रभाकर कव्हर, मंगला गिरी, रजनी बेलसरे, लक्ष्मी बग्गन, मनोरमा मानकर, मालदारखान बलदार खान, गजानन वानखडे, सतीश ठाकरे, सुनील मानकर, मधुकर राठोड, काशिराम गाडगे, यमुनाबाई माऊलीकर, कल्पना मेसरे, सुरेश बंड आदि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुद्धा बेमुदत आंदोलन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रश्न व्यवस्थापनाने ऐरणीवर ठेवला असून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुद्धा
ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या पानामध्ये बेमुदत आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामध्ये मुरलीधर
शिरसागर, डॉ. के. जी. अरबट श्रीराम निकामे, सतिष नाभरे यांचा समावेश आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुद्धा पोलिसात ही माहिती दिली आहे त्यामध्ये ई.पी.एफ.चे बाकी असलेले पैसे अद्याप पर्यंत भरलेले नाहीत तसेच ग्रॅज्युटी व त्यांचे कोणत्याही प्रकारचे निवृत्तीनंतरचे सुविधा आम्हास दिली नाही वेळोवेळी लेखी अर्ज व तोंडी सांगून सुद्धा दखल घेतली नाही मस्टर वरून नाव कमी करून सूचना पत्र देऊन पगार बंद केला त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.आमचे जॉइनिंग 2004 पर्यंत असा आमच्या पगारातून कपात केलेली रक्कम सुद्धा आपण आमच्या खात्यात जमा केलेले नाही असे त्यांनी निवेदनात नमूद केले.असून आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी त्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे व्यवस्थापनाला पातुर पोलीस स्टेशनला तहसीलदार पातुर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे.