गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक आडगाव येथील नामवंत असे डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलने कोरोना काळात गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना रुग्णांची अविरत सेवा केली. अशा हॉस्पिटलचे वाहन चालक व आडगाव परिसरातील ॲम्बुलन्स वाहन चालक यांचा आज महाराष्ट्र पोलीस मित्र समिती नाशिक यांच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या व्यक्तींनी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच कर्तव्य बजावत जी कामगिरी केली त्यासाठी एक कौतुकाची थाप म्हणून आज या समितीच्या वतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला. खर तर हा सत्कार करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांची रुग्णवाहिका चालकाप्रती प्रेम निर्माण करावं आणि रुग्ण वाहिका चलकलही वाटावं की खरंच आपण जे काम करतो आहे ते नक्कीच वेगळ आहे. जेणेकरून नवीन पिढीस याचा चांगला आदर्श देखील घेता येईल.यावेळी उपस्थित सर्व रुग्णवाहिका चालक आडगाव परिसरातील ॲम्बुलन्स वाहन तसेच तसेच समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई शिंदे शहर अध्यक्ष शामराव पिंपरकर शहर उपाध्यक्ष मोहन गोसावी पंचवटी महिला अध्यक्ष वैशालीताई त्र्यंबके, पंचवटी उपाध्यक्ष संतोष चिडे, ओढा शाखा अध्यक्ष गुलाब मराडे व रिटायर पोलीस उपनिरीक्षक सुखदेव शिंदे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.










