कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार: दिनांक 14 मे, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या 01-नंदुरबार (अ.ज.) मतदार संघात एकूण 70.68 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदान याप्रमाणे आहे..
01- अक्कलकुवा- 75.01 टक्के
02- शहादा- 71.49 टक्के
03- नंदुरबार- 66.67 टक्के
04- नवापूर- 80.18 टक्के
05- साक्री- 67.60 टक्के
09- शिरपूर- 65.05 टक्के