मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
परभणी शहरातील संविधानाच्या अवमान प्रकरणी व शहिद सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच् पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ सर्व जाती धर्माच्या लोकांनी पुकारलेल्या बंदला,व निषेध सभेला उदंड प्रतिसाद देत आपापले प्रतिष्ठाने व विविध प्रकारच्या व्यापारी यांनी देखील आपला व्यवसाय बंद करून सदरील निषेध सभेत सामाजिक व जातीय सलोखा कायम राहावा म्हणून नरसी येथील जनतेने महिला, शेकडो पुरुष, तरुण, वयस्कर मंडळी ह्या निषेध सभेला उपस्थित होते.अनेक आंबेडकरी अनुयायांनी फारचं शांत व संयमी वृत्तीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार व राज्य प्रशासन यांना तीव्रशब्दात भावना व्यक्त करताना परभणी शहरातील पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसह शहिद मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत रुपये दहा लाख देण्यात यावे व त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, त्याचबरोबर भविष्यात असा प्रकार खपवून घेणार नाही अशी भावना व्यक्त केल्या.यावेळी गंगाधर भेदे, हाणमंत पोचिराम भेदे,लालबा सुर्यवंशी, जळबा सुर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, देविदास सुर्यवंशी, विलास भेदे सचिन भेदे, साईनाथ कांबळे जिगळेकर, नागसेन जिगळेकर गंगाधर कोतावार,कॅ.लोहगावकर प्रकाश भिमराव भेदे,यादव वाघमारे,ग्राम पंचायत सदस्य भिमाबाई भेदे, मिराताई भेदे,हाणमाबाई झगडे , आदी सह शेकडोंच्या संख्येने संविधान प्रेमी, आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.सदरील कार्यक्रमासाठी रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी आपल्या फौजफाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता.

