प्रकाश केदारे उप-जिल्हा प्रतिनिधी परभणी
दि१८ डिसेंबर मानवत व परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा व जनतेचा महत्त्वाचा प्रश्न असलेल्या ५४ गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास विभाग छत्रपती संभाजी नगर यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आ. राजेश विटेकर यांचा विधानसभा सदस्य म्हणून अधिवेशनाचा पहिलाच दिवस असताना त्यांनी पाथरी मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी राजेश.आ. डॉ. रत्नाकर गुट्टे कृ.उ.बा सभापती पंकज आंबेगावकर माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मानवत परभणी तालुक्यातील ५४ गावातील १ लाख शेतकरी. नागरिकांच्या जीवनाशी संबोधित असलेल्या महत्त्वाच्या कामाची गरज वि षद केली. मुख्यमंत्री यांनी बारकाईने अहवालाचे निरीक्षण करून तुमच्या आमदारकीच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिलेच काम जनहिताच्या हाती घेऊन तुम्ही तुमच्या कार्याची योग्य सुरुवात केली असल्याने हे काम मंजूर होणे गरजेचे आहे असे म्हणत संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान मागील अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिक शेतकऱ्यांनी संघर्ष समितीने आंदोलन करून लढा दिला होता आता सदर प्रश्न मार्गी लागला आहे.