अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
आज देश बेरोजगारीच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. मोठ्या पदव्या घेऊनही आज तरुणाई कामानिमित्त भटकत आहे.नवीन रोजगार निर्मिती तर दूरच, देशभरातील लाखो सरकारी रिक्त पदांवर भरतीच होत नाही, जिथे भरती होत आहे, ती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे, त्यामुळे काम करूनही लोकांना सन्मानाने जगणे कठीण झाले आहे.खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याऐवजी छाटणीची टांगती तलवार लोकांच्या डोक्यावर फिरत आहे.आधीच बेरोजगारीचा सामना करत असलेली आपली अर्थव्यवस्था कोरोनामुळे अधिक चिंताजनक स्थितीत आली आहे.
आज बेरोजगारीची समस्या फक्त खेड्यातील लोकांचीच नाही तर मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांचीही आहे. माणूस कोणत्याही जातीत जन्मलेला असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणतीही भाषा बोलत असो, कोणत्याही प्रदेशात राहणारा असो, स्त्री असो, पुरुष असो वा तृतीय लिंग असो, कोणीही असो तो या बेरोजगारीच्या हल्ल्यातून, संकटातून सुटू शकला नाही.देश की बात फाऊंडेशनचे प्रादेशिक समन्वयक शुभम अंभोरे म्हणाले की, ‘देश की बात फाऊंडेशन’ ही एक वैचारिक संस्था आहे आणि ‘सकारात्मक राष्ट्रवाद’ या विचारसरणीच्या आधारे राष्ट्र उभारणीसाठी काम करत आहे, सकारात्मक राष्ट्रवादावर विश्वास ठेवते, बेरोजगारी या समस्येचे समाधान व उपाय-‘राष्ट्रीय रोजगार धोरण’ आहे.’राष्ट्रवाद’ नुसार, रोजगार हा केवळ आर्थिक प्रश्न नसून तो राष्ट्र उभारणीत प्रत्येकाच्या वाट्याचा विषय आहे.रोजगाराच्या माध्यमातून केवळ रोटी, कपडा, मकान या भौतिक गरजाच नाही तर आत्मसंतुष्टी आणि स्वाभिमानही राष्ट्र उभारणीत सहभागातून पूर्ण होतो.देश की बात फाऊंडेशनचे प्रादेशिक समन्वयक शुभम अंभोरे म्हणाले देश की बात फाऊंडेशन देशभरात रोजगार संवाद आयोजित करत आहे.या अंतर्गत महाराष्ट्रातही देश की बात फाऊंडेशनच्या वतीने अकोल्यात १३ नोव्हेंबर रोजी रोजगार संवादाचे आयोजन करण्यात येत आहे.देश की बात प्रादेशिक सह-समन्वयक रुचिका वाटमोडे म्हणाल्या अकोल्यातील देश की बात फाऊंडेशनच्या वतीने 13 नोव्हेंबर रोजी शेतकरी सदन-पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे दुपारी 11 ते 2 या वेळेत रोजगार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेत देश की बात फाऊंडेशनच्या सदस्यांव्यतिरिक्त समविचारी विद्यापीठातील विद्यार्थी व सर्व विद्यार्थी संघटना, युवा संघटना, शिक्षक संघटना, कामगार संघटना, व्यापारी संघटना, महिला संघटना, शेतकरी संघटना, स्वयंसेवी संस्था, आर.डब्ल्यू.ए. व इतर संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतील.शुभम अंभोरे पुढे म्हणाले या संपूर्ण रोजगार संवादाचे नियोजन व व्यवस्थापन देश की बात फाऊंडेशन ची अकोला जिल्हा समिती अमर कांबळे,राजू कांबळे,दीपक जाधव,सुखदेव मदनकार, निखिल कुर्हेकर, नारायण भाऊ सरोदे,सचिन कीर्तने, करत आहेत तसेच या रोजगार संवादात देश की बातचे केंद्रीय समन्वयक महेश जी सामंत आणि केंद्रीय सह-समन्वयक महेशजी चौधरी हे देखील दिल्लीहून येणार आहेत.