मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
बोर्लीपंचतन येथे डॉ.कौस्तुभ दिलीप केळस्कर यांच्या स्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन रविवार दि.३०जुलै रोजी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिवेआगरचे सरपंच सिद्धेश कोसबे यांच्या हस्ते करण्यात आले.बोर्ली पंचक्रोशीतील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवेआभावी नाईलाजाने माणगाव,महाड, पनवेल येथे जावे लागत असल्याने रुग्णाच्या अत्यवस्थ परिस्थितीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होऊन त्यांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते.परंतु आता श्रीवर्धन येथील कन्सल्टिंग फिजिशियन,हृदयरोग,उच्च रक्तदाब,दमा,मधुमेह, टी.बी.संधिवात तज्ञ व आय.सी.यू.स्पेशालिस्ट डॉक्टर ऑफ मेडिसिन एम.डी.(पुणे) एमबीबीएस (मिरज) डॉ. कौस्तुभ केळस्कर यांच्या स्पेशालिटी क्लिनिकमध्ये रुग्णांना हार्टअॕटॅक, पॅरॅलिसिस,डायबिटीस,फिटस्,हाता पायांमध्ये मुंग्या येणे, अॕलर्जी,दमा/अस्थमा,वारंवार खोकला,छातीत पाणी, न्यूमोनिया ट्युबरक्युलॉसिस (टी.बी.) थुंकीत रक्त पडणे, कावीळ,लिव्हरचे आजार, अॕसीडीटी,थायरॉईड, ॲनिमिया,त्वचा रोग,किडनी विकार,मलेरिया,टायफाईड डेंग्यू,रक्ताची उलटी अशा विविध आजारावरील सर्वांगीण उपचार एकाच छताखाली मिळू शकणार असल्याने पंचक्रोशीतील रुग्णांना हे क्लिनिक वरदान ठरेल.आठवड्यातील दर सोमवार व मंगळवार या दिवशी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या क्लिनिकची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना या वैद्यकीय सेवेचा लाभ निश्चित होईल व रुग्णांना चांगली सेवा एक स्थानिक उच्चशिक्षित एम.डी.डॉ. कौस्तुभ केळस्कर यांच्याकडून घडेल असा विश्वास या क्लिनीकच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला.