नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी, महागाव
महागाव तालुक्यातील मौजे वडद,मुडाना,उटी,अंबोडा शिरपूर, करंजी,गुंज चिलगव्हान या गावाना भेटी देत अतिवृष्टी भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ पंचनामे करून मदत करण्यासंदर्भात संबंधित विभागांना सूचना दिल्या याप्रसंगी गावकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या आमदार साहेबाच्या समोर कथन केल्या आणि तेवढ्याच तत्परतेने आमदार साहेबांनी शक्य तेवढ्या लवकर त्या पूर्ण करण्या बद्दल उपस्थितांना अश्वासित केले. याप्रसंगी पंजाबराव गावंडे सुरेश नरवाडे, विलास शेबे विठ्ठल जंगले निलेश पाटील नरवाडे , अजयजी पुरोहित, प्रवीण राऊत गजानन तुंनगर बाळू करपे लालमन असोले समाधान ठाकरे राहुल आडे संतोष पडोळकर मनोज काळे इत्यादी उपस्थित होते.