अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विडूळ बिटमधील हरदडा आणि परिसरात खुले आम जुगार चालु असून त्यामुळे या परिसरात शांतता, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची तक्रार उमरखेड पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.मागील अनेक महिन्या पासून विडूळ बिटमधील हरदडा आणि परिसरात जुगार सुरू असून विशेष उल्लेखनीय म्हणजे खुद्द विडूळ मध्येही मटक्याचे अनेक काऊंटर खुलेआमपणे राजरोस सुरू आहेत. त्यामुळे परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा, सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची तक्रार प्रवेश उत्तमराव कवडे हरदडा आणि अशोक लक्ष्मण गायकवाड यांनी केली असून सदर प्रकारामुळे घराघरात भांडण तंटे निर्माण होत असून जुगार असाच चालू राहिला तर परिसरात चोऱ्याचेही प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोरगरीब व शेतकऱ्यांचीही लूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर जुगार ताबडतोब बंद करण्यात यावा अशी तक्रार पोलीस स्टेशन उमरखेड येथे दि.८ डिसेंबर रोजी कवडे आणि गायकवाड यांच्या तर्फे करण्यात आलेली असून पोलीस स्टेशन उमरखेड त्यांच्या या अर्जाची दखल घेऊन काय कार्यवाही करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.