उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी, तळोदा
तळोदा – नंदुरबार जिल्ह्यात शेतमाल व इतर चोरीचा घटनांत मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती त्यांच्या तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नंदुरबार पोलिसांसमोर होते त्यासाठी पोलिस रेकॉर्ड वरील व इतर गुन्हेगारांवर पाळत ठेवून गुप्त बातमीदारांकडून सुद्धा माहिती गोळा करीत होते त्यातच पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की मागील काही दिवसांत सारंगखेडा व शहादा पोलीस ठाणे हद्दीत कापूस,सोयाबीन, तांदूळ चोरी करणारे आरोपी हे बोरद ता.तळोदा जि. नंदुरबार येथील आहेत व चोरी केलेला माल संशयित आरोपींनी त्यांच्याच एका साथीदाराच्या घरामागे पोत्यांमध्ये लपवून ठेवला आहे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वात पथकाची स्थापना करून आरोपींना जेरबंद करण्याची कारवाईचे आदेश दिले.
पथकाने बोरद गावात जाऊन संशयित दीपक सतीलाल पिंपळे वय- 22यास ताब्यात घेऊन चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने सदर चोऱ्या बोरद गांवातील त्याचे साथीदार अशोक भरत पवार वय-27,शिराख पदम ठाकरे वय-24,नवनाथ रमण चव्हाण वय-22 सर्व रा.बोरद यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. लगेच पथकाने ह्या तिघांना सुद्धा ताब्यात घेत विचारपूस सुरू केली परंतु त्यानी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी संशयितांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी शहादा व सारंगखेडा येथून मागील काही दिवसात कापूस,सोयाबीन,तांदूळ चोरी केल्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. संशयितांकडून 60 हजार किंमतीचे 12 क्विंटल सोयाबीन जप्त केले याबाबत सारंगखेडा पो स्टे ला गु र क्र 265/2023 भादंवी कलम 379,547 अन्वये गुन्हा दाखल आहे तसेच 95 हजार किंमतीचा 19 क्विंटल कापूस व गुन्ह्यात वापरलेले 1लाख25 हजार किंमतीचे चार चाकी वाहन असा ऐकून 2लाख 20 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत शहादा पो स्टे ला गु र नं 688/2023 भादंवी कलम 454,457,380 अन्वये गुन्हा दाखल आहे तसेच 540 रु किंमतीचा 45किलो तांदूळ सुद्धा जप्त करण्यात आला त्याबाबत सारंगखेडा पो स्टे हद्दीतील बामखेडा जिल्हा परिषद शाळेतून तांदूळ,तूरडाळ,तेल व इतर वस्तू चोरीबाबत सारंगखेडा पो स्टे येथे गु र नं 148/2023 व गु र नं 160/2023 अन्वये 2 गुन्हे दाखल आहेत अश्या प्रकारे एकूण 2लाख 80हजार540 रु किंमतीचा मुद्देमाल वरील चार सशयितांकडून हस्तगत करण्यात येऊन चार गुन्हे उघडकीस आणण्यात नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे तसेच संशयितांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सारंगखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक पी आर पाटील अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार खेडकर,सहा पो नि दिनेश भदाणे,पो उ नि हेमंत मोहिते,पो ना बापू बागुल,विशाल नागरे,सुनील पाडवी, पुरुषोत्तम सोनार,विकास कापुरे,मोहन ढमढेरे,पो अं विजय ढिवरे, यशोदीप ओगले यांनी पार पाडली.एकाच कारवाईत चार गुन्हे उघड केल्याबद्दल नंदुरबार पोलिसांचे कौतुक होत आहे.