व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधि अहेरी
अहेरी स्थानिक पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित रेला नृत्य स्पर्धा व जनजागरण मेळावा आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलात घेवून स्पर्धकांना बक्षीस व योजनांची माहिती देण्यात आली.पोलीस अधिक्षक नीलोत्पल , अप्पर पो.अधिक्षक यतीश देशमुख , अप्पर पो.अधिक्षक कुमार चिंता , मा.अप्पर पो.अधिक्षक एम रमेश यांच्या संकल्पनेतुन व स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन अहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांदे यांच्या नियोजनात आज दिनांक 11 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन अहेरी तर्फे क्रीडा संकुल आलापल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व रेला नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर मेळाव्याचे उदघाटक श्री सय्यद नायब तहसीलदार अहेरी , अध्यक्ष स्थानी शंकर मेश्राम सरपंच ग्रामपंचायत आलापल्ली यानी भुषविले. प्रमुख पाहुणे पद प्राचार्य गजानन लोंनबले यानी भुषविले. मेळावा करिता 350 ते 400 नागरिक उपस्थित होते.रेला नृत्य स्पर्धा विजेते संघात प्रथम पारितोषिक आदिवासी मुलांचे वस्तीगृह आलापल्ली तर द्वितिय पारितोषिक कालि कंकाली रेलाडान्स ग्रुप चिटूगुंठा यांनी पटकाविला. त्यांना अनुक्रमे तीन व दोन हजाराची रोख देण्यात आली.तसेच तृतीय पारितोषिक
शंकरराव बेझलवार महाविद्यालय अहेरी यांनी मिळविला असून त्यांना एक हजार रू रोख देण्यात आले.तसेच तिन्ही क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक , ट्रॉफी व प्रोत्साहन पर बक्षिसे देखील देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना प्रशस्तीपत्र व प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
सदर मेळाव्यात राबविन्यात येनाऱ्या विविध शासकीय योजनाची माहिती देउन लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
तसेच सर्व उपस्थिताना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


