सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
शहादा गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी पालकमंत्री अनिल पाटील व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित रात्रीच्या वेळी मोबाईलच्या उजेडातच केली. यावेळी मंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तातडीने मदत राज्य सरकारकडुन जाहिर केली जाईल, असे शेतकऱ्यांना आश्र्वासन दिले गेले गेल्या आठवड्यात तसेच त्यानंतरही झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते २ हजार ८०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे.