दशरथ गायकवाड
तालुका प्रतिनिधी मेहकर
मेहकर तालुक्यातील वरवंड येथील सिद्धांताश्रम प्राथमिक आश्रमशाळा येथे 6 डिसेंबर 2023 बुधवारला अवधेश असेसमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या संस्थेअंतर्गत.आपत्ती व्यस्थापक मार्गदर्शक श्री अशांत कोकाटे व इतर दोन सहकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज या विषयावर प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी आपत्तीचे प्रकार आपत्ती आल्यास घ्यावयाची काळजी यासंबंधी आगीचे प्रत्यक्ष पूर व्यवस्थापन या विषयावर मॉक ड्रिल डेमो दाखवून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यावेळी सिद्धांताश्रम प्राथमिक आश्रम शाळा वरवंड येथील मुख्याध्यापक श्री.देवेंद्र पदमने व सर्व शिक्षक विनोद वानखेडे, जनार्दन बोरे, संदीप राठोड प्रवीण डव्हळे विवेक कांबळे प्रवीण लाड वस्तीगृह कर्मचारी नारायण सोंडकर भिकाजी बोराडे ज्ञानेश्वर सुरडकर यांनी व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच सर्व शाळेचे सहकारी शिक्षक वृंद तसेच सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


