अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
पुरोगामी तर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार २०२३ जाहिर झाले असून येत्या २७ नोव्हेंबरला भारतीय संविधान दिवस व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून पुरोगामी युवा ब्रिगेड च्या वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरीत होणार आहे.
सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचे पुरोगामी युवा ब्रिगेड दरवर्षी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करित असते.यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असुन तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या ९ व्यक्ती व संस्थांची निवड यात करण्यात आली आहे.पुरोगामी युवा ब्रिगेड च्या चतुर्थ वर्धापन दिनी तसेच संविधान दिवस आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.सदर पुरस्कारासाठी ९ व्यक्ती व संस्थेची निवड करण्यात आली असून यामध्ये औदुंबर ज्येष्ठ नागरीक मंडळ, उमरखेड माधुरी उत्तमराव दळवी ( प्रभाग समनव्यक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती उमरखेड), ॲड. अरमान अंबेजोगाईकर, मूर्तिकार बंडू भुते, पत्रकार डॉ अविनाश खंदारे, पत्रकार व्यंकटेश पेन्शनवार, यवतमाळ येथील युवा कलाकार निशांत सिडाम, हदगाव येथील प्रयोगशील शिक्षक बालाजी सादुलवार सर, पोलिस कर्मचारी संतोष राठोड आदींना जाहीर झाले असून यासह काही व्यक्ती व संस्थांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 27 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 12 वाजता श्रीराम मंगल कार्यालय, ढाणकी रोड उमरखेड येथे पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरोगामी युवा ब्रिगेड उमरखेड च्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.