दिगंबर तेलंगे
तालुका प्रतिनिधी कंधार
पुणे संगमवाडी येथे क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या 229 वि जयंती दिनांक 14 11 2023 रोजी साजरी करण्यात आली. त्या जयंतीनिमित्त मामा गायकवाड कंधारकर यांना या जयंतीनिमित्त जयंती मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. गेल्या मागील काही वर्षापासून मामा गायकवाड यांनी कंधार नांदेड या परिसरात सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य व गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे व रस्त्यावर उतरून मोर्चा काढणे आंदोलने करणे अशा अनेक त्यांनी कार्य केलेल्या कार्याची दखल घेऊन पुणे संगमवाडी येथील क्रांती गुरु लहुजी साळवे जयंती मंडळाने क्रांती गुरु लहुजी साळवे यांच्या 229 व्या जयंतीनिमित्त मामा गायकवाड कंधार यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणहून मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते व हे कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जयंती मंडळाने मोठा परिसरात घेतला होता.