संतोष भरणे.
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर.
इंदापूर – गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून शहा संस्कृतिक भवन येथे सकाळी 11 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असुन येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या जाणार व दूध दर प्रश्न,कांदा,सोयाबीन अशा अनेक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणारअसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरकडे अधिक लक्ष दिले असून ते सातत्याने इंदापूरचा दौरा करत आहेत.पक्षाच्या फुटी नंतर अनेक पदाधिकारी हे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे गेल्याचे पहावयास मिळत असताना इंदापूर तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेले युवकांचे आशास्थान पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर कार्यक्रमात दिसू लागल्याने शरद पवार गटाला अधिक बळकटी मिळल्याचे पहावयास मिळत आहे.आता कोण आहेत ते निष्ठावंत जे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याला लागलेली आहे.लोकनेते शरदचंद्र पवार यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी त्यांना मानणाऱ्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले.यावेळी इंदापूर तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेले युवकांचे आशास्थान पुणे जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती प्रवीण भैया माने उपस्थित होते.