मारोती सुर्यवंशी
नरसी शहर प्रतिनिधी
नरसी शहर व परिसरातील नागरीकांच्या कायम स्मरणात राहतील असे व्यक्तिमत्व, ज्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आणि साहित्यिक असणाऱ्या व वक्तृत्व कौशल्याने जणू आपली सोडताना त्यांनी सदैव समाजातील विविध घटकांना एकत्र करून त्याची समस्या जाणून घेऊन त्या नेहमीच सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणारे आशी ख्याती होती पण…. अशी दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्या महान
संघर्ष योध्दा च्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त स्मृती पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध सर्प दंश उपचार तज्ञ डॉ.दिलीप पुंडे साहेब यांचें “सर्प दंश जनजागृती” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या “कर्तुत्वाचा सन्मान” केला जाणार आहे.यात सन्मान मुर्ती, साहित्य ,प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी सर, सामाजिक, डॉ.दिलीप पुंडे साहेब, राजकीय, नागोराव रोषणगावकर साहेब, कृषी, उमाकांतराव देशपांडे साहेब आणि सांस्कृतिक,शाहिर दिगू तुमवाड साहेब यांच्या कर्तुत्वाचा गौरव करण्यात येणार आहे, सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष
म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे उपस्थित राहणार आहेत तेव्हा नरसी शहर व परिसरातील नागरीकांनी ह्या पुण्यस्मरण,व पुरस्कार सोहळ्यात सहभागी व्हा आशी विनंती प्रकाशदादा पाटील भिलवंडे, राजेश पा.भिलवंडे, भास्कर पा.भिलवंडे,सौ.माधवी जगन्नाथराव शेळके,सौ.रेखा श्रीहरी काळे व समस्त भिलवंडे परिवारातर्फे करण्यात आले आहे.


