प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२३ नोव्हेंबर
वक्तृत्व स्पर्धेचे विजयी स्पर्धक अंदमान दर्शन सहलीसाठी रवाना.
परभणी: (दि 22 नोव्हें) येथील वीर सावरकर विचार मंच द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजयी स्पर्धक अंदमान सहलीसाठी आज रवाना झाले. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी वीर सावरकर विचार मंच द्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते, स्पर्धेच्या प्रथम , द्वितीय व तृतीय विजेत्याना ही दर्शन सहल पारितोषिक म्हणून घोषित केली जाते. 17 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित स्पर्धेचे प्रथम – अभिनव खुळे, द्वितीय- पार्वती तळेकर व तृतीय – कल्याणी सातपुते हे स्पर्धक श्री सचिन सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंदमान येथील सेल्युलर जेल जेथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा उपभोगली अशा ऐतिहासिक पावन स्थळास भेट देणार आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी राजेंद्र मुंढे, मधुकर गव्हाणे, नविनचंद्र मोरे, रविकिरण गंभीरे, प्रशांत खरवडकर,संजय रिझवानी, प्रताप देशपांडे, कुलभूषण सातपुते, राजेश देशपांडे, लिंबाजी तळेकर, श्रीकांत उमरीकर, योगेश गौतम आदींची उपस्थिती होते.