अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
मोताळा:- तालुक्यातील धामणगाव बढे येथील नशामुक्त राज्याचे संस्थापक स्वातंत्रवीर शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान र.अ यांची जयंती फार उत्सवाने साजरी करण्यात आली,पूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली,टिपू सुलतान चौक येथे मा. सरपंचपति अलिम कुरेशी यांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले,टिपू सुलतान यांना इंग्रजा विरूद्ध स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने शहीद होणारा एकमेव राजा म्हणून ओळखले जाते,परंतू टिपू सुलतान हे उत्तम शासक ,असामान्य योद्धा तर होतेच त्याच बरोबर टिपू सुलतान हे वैज्ञानिक,समाज उद्धारक,तत्व वेत्ते,संशोधक,भूगर्भ शास्त्रज्ञ,यांत्रीकी अभियंता,यशस्वी उद्योजक,साहित्यिक,युद्ध व्यवस्थापन तज्ञ,कृषी विकासक ईत्यादी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे एकमेव अष्टपैलू व्यक्तिगत होय.टिपू सुलतान हे धर्म सहिष्णू राजे होते,त्यांनी 156 मंदीरांना देणग्या दिल्याचे पुरावा आज ही मैसुर गैझेटीयर मध्ये उपलब्ध आहे,टिपू सुलतान बद्दल महात्मा गांधी यंग इंडियाच्या 23 जानेवारी 1930 च्या अंकात म्हणतात टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता इंग्रजांनी टिपू ला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या 4 ही बाजुने श्रीवेंकटरमना ,श्रीनिवास,श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिपू सुलतान धर्म सहिष्णू होते हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते.या कार्यक्रमात पोलिस प्रशासन यांनी सहकार्य केले, शेर ए हिंद हजरत टीपू सुलतान यांच्या जीवन चरित्र वर प्रकाश टाकले,मा.सरपंचपति अलिम कुरेशी,AIMIM तालुकाध्यक्ष आरिफ खान,असलम खान पत्रकार,ग्रा.पं सदस्य सय्यद बिस्मिल्ला यांनी मार्गदर्शन केले, व आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं सदस्य जमीर इमाम कुरेशी यावेळी इम्रान शेख,अलिम शाह पत्रकार, ग्रा.पं सदस्य हाफिज सादिक,सय्यद अजहर,मुजीब कुरेशी,आसिफ पठाण,आसिफ कुरेशी,यांच्यासह गावातील युवा तरुण यांची उपस्थिती होती,