मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि:22 नोव्हेंबर 2023 परळी तालुक्यातील शिरसाळा येथे माजलगाव विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.डी.बी.धीरजकुमार यांच्या पथकाने छापा मारून कल्याण नावाचा मटका जुगार आड्डयावर मटका जुगार खेळत व खेळवीत असताना तिघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्य पोलीस अधीक्षक डॉ. डी.बी.धीरज कुमार यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांच्या पथकाने छापा मारला. येथील मोहा रोड येथे पत्राच्या टपरीमध्ये आरोपी चंद्रकांत श्रीराम कांदे (रा रेवली.ता.परळी) संतोष लक्ष्मण चोपडे,अविष्कार अशोक कांबळे (रा.शिरसाळा ता.परळी) हे शासनाने बंदी घातलेली असतानां स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीताना रंगेहाथ मिळून आले.या कार्यवाहीत 34 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक,अंबाजोगाई बीडचे अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.देशमुख,पो.का.संतराम थापडे,पो.का.कानतोडे यांनी केली.पो.ह.अतिषकुमार देशमुख यांच्या फिर्यादीवरून शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









