प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दिनांक 21 नोव्हेंबर वार मंगळवार रोजी , रंगनाथ रावजी सोळंके यांचे जनसंवाद कार्यालय सोनपेठ या ठिकाणी ,सोनपेठ मंडळातील बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पाथरी विधानसभा युवा वॉरियर्स यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून परभणी लोकसभा विस्तारक श्री प्रमोद जी कराड साहेब,पाथरी विधानसभा श्री रेणुका दासजी देशमुख व सोनपेठ मंडळ अल्पकालीन विस्तारक श्री युवराज जी बचाटे* उपस्थित होते .आढावा बैठकीसाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. येणाऱ्या काळातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मेरा बुथ सबसे मजबूत या अभियान अंतर्गत बुथ बांधण्याची रचना करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सोनपेठ मंडळातील , प्रत्येक बूथ वरून 51 टक्के पेक्षा जास्त मतदान कसे आपल्या पक्षाला मिळविता येईल, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व चर्चा करण्यात आली.
सोनपेठ मंडळातील माजी मंडळ अध्यक्ष महादेव गिरे पाटील , जिल्हा निमंत्रित सदस्य मल्लिकार्जुन सौंदळे सर, मंडळ अध्यक्ष श्रीराम राठोड, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष परमेश्वर जी गवाडे पाटील ,ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्ष प्रल्हादजी आढाव , किसान मोर्चा मंडळ अध्यक्ष भगवानजी चव्हाण , कामगार आघाडी मंडळ अध्यक्ष शिवरामजी रोडे, मंडळ उपाध्यक्ष परमेश्वर जी यादव, मंडळ सरचिटणीस आप्पासाहेब मुलगीर, शक्ती केंद्रप्रमुख व पाथरी विधानसभा युवा वॉरियर्स उपस्थित होते.