अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- घाटंजी शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यावसायिक अंबादास बालाबकस अग्रवाल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. तसेच ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने घाटंजी शहरात दुःख व्यक्त केल्या जात आहे. घाटंजी शहरातील युवा उद्योजक राम फटाका सेंटरचे ठोक व चिल्लर विक्रेता राम अग्रवाल यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात राम अग्रवाल, गोपाल अग्रवाल असे दोन मुले असुन त्यांच्या मागे मुले, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

