दै. अधिकारनामा
पातूर : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पातूरच्या वतीने पातुर येथील श्री सिदाजी महाराज मंगल कार्यालय सभागृहामध्ये गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ते 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत श्रीमद भगवत गीता ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.असून यामध्ये रामायण महाभारत आणि भगवत गीता यावर आधारित प्रवचन माला आयोजित केली आहे. यासोबत श्रीकृष्ण जन्माष्टमाची झाकी सोबत सुदामा चरित्र दर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आज दुपारी केंद्राचे सभागृहामध्ये एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सदर कार्यक्रमाची सविस्तर माहिती ब्रह्माकुमारी लीना दीदी संचालिका ब्रह्माकुमारीस पातुर यांनी यावेळी दिली याप्रसंगी पातुर येथील पत्रकार देवानंद गहिले, सतीश सरोदे,अविनाश पोहरे, हसनबाबू, जुबेर शेख प्रा. गजानन खंडारे, प्रा. अतुल विखे, ब्रह्माकुमारी प्रभादिदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.