मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
अहील्यानगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच व सदस्य,स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा राहुरी येथील अहिल्याभवन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.किशोर खेडेकरहे होते प्रमुख पाहुणे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.शंकर पाटील खेमनरहे होते. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की अहिल्यादेवी प्रतिष्ठान राहुरी यांनी 2013 ते 2014 पासून धनगर समाज ऐक्याची उल्लेखनीय चळवळ या जिल्ह्यामध्ये उभी करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला दिशा देण्याचे काम केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरक्षणाचे आंदोलने उभी करणे राजकीय कामांमध्ये समाज बांधवांना पाठबळ देणे तसेच अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी 14 तालुक्यांमध्ये नामांतर रथ यात्रा काढून जनजागृती करून राज्य सरकारला अहिल्यानगर हे नाव घोषित करण्यासाठी भाग पाडले आणि यामध्ये प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे हे विसरता येणार नाही. धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये प्रतिष्ठान जी भूमिका घेईल त्या भूमिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खेमनर साहेब यांनी दिले.यावेळी अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा.रभाजी पाटील सूळ यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये असलो तरी सर्वात प्रथम धनगर जातीचे आहोत हे कदापिही विसरणार नाही. अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांनी सर्व राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रित करून धनगर समाज ऐक्याची जी मशाल पेटवली आहे ती मशाल धनगर आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत विझता कामा नये. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये कायमस्वरूपी पुढे राहिलो आणि यानंतरही अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान जी भूमिका घेईल ती स्वीकारण्याची तयारी आहे असे आश्वासन दिले.या कार्यक्रमासाठी मिरी येथील उपोषणकर्ते मा.राजू मामा तागडबाळासाहेब कोळसे, शेवगाव मार्केट कमिटीचे उपसभापती मा.गणेश खंबरे,नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मिसाळ, सौ. अश्विनी काळे,सौ.सुंदरबाई ढवान,पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब नर्हे,पाथर्डी मार्केट कमिटीचे संचालक जिजाबापू लोंढे,श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक दशरथ पिसे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील बाचकर, नांदगाव चे लोकनियुक्त सरपंच सखाराम पाटील सरक, चिंचोली चे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब लाटे,धामोरी चे लोकनियुक्त सरपंच सौ.अलकाताई रामदास माने, तमनर आखाड्याच्या लोकनियुक्त सरपंच सौ.मनीषा आप्पासाहेब तमनर, घोरपडवाडी चे लोकनियुक्त सरपंच मा.मैनाबापू शेंडगे,महादेव पाणी वापर संस्थेचे चेअरमन ताराचंद पाटील तमनर, डीग्रस च्या लोकनियुक्त सरपंच सौ.रेणुका ताई गावडे,प्राध्यापक आबासाहेब गडदे, ॲड. पूजा लावरे,तनपुरे सहकारी साखर कारखान्याची संचालक अर्जुन पाटील बाचकर, घोरपडवाडी चे माजी सरपंच हरिभाऊ हापसे तसेच स्पर्धा परीक्षेतील अनेक यशवंत विद्यार्थी उपस्थित होते.आपल्या मनोगता मध्ये चिंचोली येथील धनगर समाजाचे युवा नेते सर्जेराव पाटील लाटे यांनी धनगर समाजाच्या तरुणांनी सर्व चळवळीमध्ये गट-तट न बघता एकत्र आले पाहिजे व मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर्श आपल्या प्रत्येक धनगर समाजाच्या तरुणांनी घ्यावा व धनगर समाजाच्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय जोडी बाजूला ठेवून आपण सर्वात प्रथम धनगर जमातीचे आहोत याची जाणीव ठेवावी असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ किशोर खेडेकर यांनी सांगितले की सम्राट अशोकापासून ते होळकर शाही पर्यंत धनगर समाजाला राजकीय असा मोठा वारसा आहे याची जाणीव तरुणांनी ठेवून धनगर समाजाचा इतिहास वाचला पाहिजे. अन्यथा येणारा काळ कदापि आपल्याला माफ करणार नाही. अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांनी वेळोवेळी राहुरी तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या हितासाठी घेतलेले निर्णय धनगर समाजाच्या उन्नती मध्ये खूप मोठे भरीव योगदान देणारे आहे याची प्रचिती संपूर्ण तालुक्यातील धनगर समाजाला आलेली आहे.यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी धनगर समाजातील सर्वांना आवाहन केले की राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कामकाजाची शेवटचे दिवस आहेत.आपल्याला आदिवासी प्रमाणे काही योजना सरकारकडून पदरात पाडून घेण्यामध्ये यश मिळालेले आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये आपण आरक्षणाची लढाई या जिल्ह्यामध्ये आणखी तीव्र करणार आहोत. आरक्षणाची न्यायालयीन लढाई सनतशीर मार्गाने कोर्टामध्ये चालू आहे. त्याचप्रमाणे सनतशीर मार्गाचा अवलंब करून रस्त्यावरची लढाई राज्य सरकार बरोबर करावी लागणार आहे. त्यामध्ये सर्व समाज बांधवांनी तन-मन धनाने सहकार्य करावे. असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वावरत चे सरपंच मा.ज्ञानेश्वर पाटील बाचकर,प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नानाभाऊ जुंधारे,कार्याध्यक्ष दत्ताभाऊ खेडेकर,सदस्य भारत मतकर,आप्पा सरोदे, दादाभाऊ तमनर, राजूभाऊ वाघ, भाऊसाहेब विटनोर, गोफणे सर,शिक्षक बँकेची संचालक गोरख विटनोर ,योगेश चंद,बाबासाहेब केसकर,दत्तात्रय तमनर,नानाभाऊ करमड,किशोर सूर्यभान तमनर, श्रीकांत बाचकर, दत्ताभाऊ बाचकर, सोमाजी बेदरे,बाचकर सर,विठ्ठलराव ढवण ,भगवानराव झडे साहेब, वैभव तमनर ,महेश भाऊ तमनर, शिवाजी खेडेकर, विलास दादा शेंदोरे, उमेश राव बाचकर,सौ अनुराधा मंडलिक, सौ संगीता वाकडे,सौ आशाताई वाकडे आदी समाज बांधवांनी प्रयत्न केल .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.अनिल सर डोलनर यांनी केले व उपस्थितांचे आभार प्राथमिक शिक्षक बाळासाहेब माने सर यांनी व्यक्त केले.