गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:-भुईसिगा तालुका नांदुरा येथे १९नोव्हेंबर रोजी दोन तोंडाचा सापदुर्मिळ जातीचा प्राणी असून दोन तोंडी मांडूळ सापाला समोर एक तोंड व शेपटी कडेही तोंड आढळून आले असून हा मांडूळ जातीचा साप भुईशिंगा रेल्वे लाईन जवळ आढळून आला आहे. हा मांडूळ जातीचा साप पाहून भीती वाटेल. आमच्या हाती लागलेल्या माहितीनुसार हा दुर्मिळ जातीचा मांडूळ साप प्राणी आहे. मांडूळ जातीचा साप भुईशींगा तालुका नांदुरा रेल्वे डम्पिंग जवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका व्यक्तीस दिसून आला. दुर्मिळ असा हा प्राणी दोन तोंडी साप या मांडूळ जातीच्या सापाचे वजन तब्बल तीन किलो पेक्षा जास्त असल्याचे समजते .मांडूळ सापावर तांत्रिक प्रयोग करून धन मिळते .श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी ढोंगी बाबा लाखो रुपयांचा चुना लावतात . तोंड व शेपटी दिसायला साधारण सारखीच असते मऊ जमिनीच्या बिळात वास्तव्य करतो. पैशांचा भरपूर पाऊस पाडणे ,गुप्तधन जादूटोणा चाचपडणे,व्यवसायात भरभराटी येणे अशा अंधश्रद्धेपोटी मांडूळ घरात ठेवले जातात .वन्यजीव प्राणी असल्यामुळे भारतीय संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत मांडूळ जातीचा साप बाळगणाऱ्या वर गुन्हा दाखल करून कारवाई सुद्धा केली जाते.या दुर्मिळ प्राण्याला ओम साई फाउंडेशनचे सर्पमित्र कृष्णा नालट ,विलास भाऊ निंबोळकर, नांदुरा पोलीस स्टेशनचे श्री चंद्रकांत मोरे पीएसआय यांच्या समक्ष वनविभागाचे शिरसाठ साहेब यांच्याकडे स्वाधीन करून त्याला अधिवासात सोडण्यात आले.मांडूळ जातीच्या सापामुळं खरंच गुप्तधन सापडते का ?धनाची देवता कुबेराचा दुत म्हणून या सापाकडे पाहिले जाते. या सापाचे दर्शन सुद्धा शुभ मानले जाते हा पूर्वजन्मी लपवून ठेवलेले धन मिळून देतो. अशी माणसांची समजूत आहे.