पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
आपल्या महान विचारांनी आदिवासींच्या जीवनाला दिशा देणारे लोकनायक,स्वतंत्रसेनानी,क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती घोरपड-शिरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकाश कुमरे व मयूर ढोक यांच्या हस्ते करण्यात आले.व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल श्रीरामे,प्रमुख पाहुणे कुणाल कडू,बंटी पांडे,दिनेश कुंभरे,चेतन कुंभरे,नरेंद्र मसराम,मुरलीधर सयाम यांनी भूषविले,तर कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेंद्र मानमूंडरे यांनी केले.