अंकुश जागले
तालुका प्रतिनिधी, शहापुर
शहापुर-: तालुक्यातील गृप ग्रामपंचयत अजनुप-दापुर हद्दीतील मौजे भेकरमाळ येथील राजु धोंडू जागले.यांचे घर,भर पावसाळ्यात कोसळून जमीनोधस्त झाले. त्यांना तात्काळ निवारा मिळणे आवश्यक होते परंतु पावसाळा गेला, दिवाळी गेली पिडीत कुटुंबाला घरकुल मात्र अजूनही मिळाले नाही. या बाबत सविस्तर वृत्त असे की,पिडीत कुटुंबापैकी ,घटनेच्या रात्री राजु हे एकटेच होते सुदैवाने त्याची पत्नी व मुले माहेरी गेली होती त्यामुळे मोठी जिवितहानी टळली. पिडीत हे घरात पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना, रात्री मुसळधार पाऊस पडत होता.त्यांचे घर हे, साधे कुडामातीचे असल्याने, मुसळधार पावसापुढे तग धरू शकले नाही.पुर्ण घर पिडीताच्या अंगावर कोसळले. रात्री ची वेळ असल्याने सदर दुर्घटना गावातील लोकांना कळाली नाही.परंतु शेतीच्या कामासाठी गावी आलेले, श्री अंकुश खाडे यांना, पहाटेच्या सुमारास भर झोपेत असताना अचानक जोराचा आवाज ऐकू आला. त्यांना काही तरी विपरीत घटना घडल्याचा अंदाज आला. आवाजाच्या दिशेने निघाले पहातो तर, राजु हे घराच्या ढिगार्याखाली दबलेले अवस्थेत होते. त्या नंतर खाडे यांनी तत्परता दाखवत, इतरांना आवाज देण्यास सुरवात केली. आवाजाला प्रतिसाद देत,आकाश जागले,दिपक खाडे, रेवन्नाथ जागले,हे मदतीसाठी धावून आले.शर्तीचे प्रयत्न करून राजु जागले याला बाहेर काढण्यात यश आले.त्या नंतर, १०८ च्या रुग्णवाहीकेसाठी फोन केला असता उशिरा का होईना रुग्णवाहीका घटनास्थळी पोहचली. उपचारासाठी शहापुर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले. तेथे, अशोक जी इरणक, व भास्कर जी जाधव,यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली. परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे,त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता होती म्हणून त्यांना शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे हलवण्यात आले.त्या नंतर सदर दुर्घटना संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधींना कळवली असता, त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ग्रामपंचायत कडून औषधोपचारासाठी रुपये ५ हजार,तसेच माजी आमदार पांडुरंग जी बरोरा यांनी धान्य व कपडे मदत म्हणून दिले.परंतु ती मदत तात्पुरती होती. शासनाने घरकुलाची सोय करावी अशी अपेक्षा पिडीत व गावकरी करत होते.या वेळी ग्रामविकास अधिकारी, तलाठी ग्रामपंचायत कमिटी, इ. उपस्थित होते.