अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
राज्य सरकारच्या मालकीच्या महापारेषण या उच्च दाब वहन करणाऱ्या कंपनीमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ या पदभरती प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून या पद भरती मध्ये इलेक्ट्रिशियन व वायरमन या दोन्ही ट्रेडला समान संधी 2010 पूर्वी दिली जायची परंतु प्रशासनाने यामध्ये बदल करत यंदाच्या होणाऱ्या सहाय्यक तंत्रज्ञान या पद भरती मध्ये राज्यातील वायरमन आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज भरण्यास संधी न दिल्यामुळे राज्यातील जवळपास दोन लाख उमेदवारांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला असून या पदभरती विरोधात राज्यातील वायरमन आयटीआय उत्तीर्ण उमेदवार आक्रमक झाले असून उमेदवार हे कोर्टामध्ये धाव घेण्याच्या तयारीत दिसून येत आहेत.राज्यातील वायरमन संघर्ष उमेदवारांनी महाराष्ट्र राज्यातील वायरमन आयटीआय उमेदवारांना देखील या कोर्ट याचिकेमध्ये येण्यासंदर्भात राज्यातील आयटीआय वायरमन उमेदवार आवाहन करत आहेत. या पद भरती मध्ये संधी मिळवण्यासाठी कोर्ट याचिकेमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या क्रमांकाशी संपर्क साधावा 9804010194.

