संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य दृढ होऊन कामात होणारी दिरंगाई थांबविण्यासाठी तसेच कामाशिवाय व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी अधिक भर शासकीय स्तरावरून दिला जातो. मात्र, सोशल मीडियावर विविध वस्तु खरेदी व दामदुप्पट यासारख्या फसव्या योजनांचे प्रमाण वाढले आहे. या फसव्या योजनांची लिंक पाठवून नागरिकांची दिशाभूल होत आहे.पंतप्रधान घरकुल योजना, मुक्त सौरऊर्जा, फ्री लॅपटॉप याशिवाय विविध योजनांचे. फसव्या आमिष दाखविणारी लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शासकीय पातळीपासून ग्राम प्रशासनापर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, नागरिकांना कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी
संगणीकृत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित विभागाला दस्तऐवजाची पूर्तता करावी लागते. दरम्यान सोशल मीडियावर फिरणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया करावी लागते. नोंदणी झाल्यावर दोन ते तीन प्रश्नातून अर्जदाराची मते जाणून घेतली जातात. त्यानंतर दहा मित्रांना या योजनेची माहिती पाठविण्याची अट घातली जाते. त्यामुळे याफसव्या योजनांच्या माहितीना नागरिक बळी पडत असून, वैयक्तिक माहिती ही व्हायरल होत आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजना, आपला परिवार जोडा व अडीच लाख रुपये मिळवा अशी माहिती देणारी लिंक व्हायरस झाली आहे.
या योजनेच्या लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केल्या जात आहे. या सारख्या अनेक योजनांची फसव्या माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, नागरिक व युवकांची फसगत होत आहे.