गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी, किनवट
किनवट : तालुक्यातील इस्लापूर रेल्वे स्टेशन रोड मस्जिद परिसरात टिपू सुलतान चौक येथे शेर ए हिंद शहिद टिपू सुलतान यांची २७३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम सरपंच सौ.शारदा अनिल शिनगारे यांच्या हस्ते टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्री.तुकाराम बोनगीर यांनी टिपू सुलतान यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकलं तर पत्रकार गणेश यमजलवाड यांनी सुत्रसंचालन केले . गुलजार खान यांनी आभार व्यक्त केले.यावेळी सरपंच सौ. शारदा अनिल शिनगारे, ग्रा.स.तुकाराम बोनगीर, बालाजी दुरपडे, अनिल शिनगारे, शेख लतिफ भा.ज.यु.मो.नांदेड जिल्हा सचिव, गौरव कदम, जगदीप हनवते , पत्रकार गणेश यमजलवाड, संघपाल पाटील , त्रिशरन पाटील, रवी कसबे, एजास खान,गुलजार खान,पत्रकार इमरान घोडके, बिलाल पठाण, शेख अरबाज,अजहर पठाण, मन्सूर पठाण मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक उपस्थित होते.