कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद:जनजाती सुरक्षा मंच मार्फत डिलिस्टिंग या विषयावर परिसंवाद घेऊन ज्या आदिवासींनी धर्मांतर केले,त्यात कोणी ख्रिश्चन तर कोणी बौद्ध तर कोणी मुस्लिम झाले आहेत.त्यांना आदिवासींच्या यादीतून डिलीट करण्याची मागणी या परिसंवादाच्या माध्यमातून केली जात आहे. कारण भारतातील आदिवासी समुदाय आपल्याला स्वतंत्र धर्म कोड देण्यात यावा ही मागणी काही वर्षापासून करीत आहेत.जर हे लोक इतर धर्मिय झालेत तर हिंदू राष्ट्र संकल्पना पुर्णत्वास जाणार नाही. म्हणून धाकधपट दाखवून आदिवासींचे हिंदूकरण करण्याचा हा कुटील डाव आहे.डिलिस्टिंग मुळे आदिवासींच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात होणार आहे.याचा आदिवासींनी पुरजोर विरोध केला पाहिजे असे मत बिरसा क्रांती दलाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष मा.दशरथ मडावी यांनी व्यक्त केले.ते जिल्हा स्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते .आदिवासींचे नायक तंट्या मामा भिल्ल व सोमा डोमा उमरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि.१०डिसेंबर २०२३ ला, उमरखेड येथे भव्य असे आदिवासी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यासंदर्भाने पुर्वनियोजन बैठक पुसद येथील वसंतराव पुरके कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बोरगडी, पुसद येथे बिरसा क्रांती दलाचे वतीने आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रमुख उपस्थिती रंगराव काळे, प्रदेश अध्यक्ष, डि.बी.अंबुरे, प्रदेश उपाध्यक्ष,नारायण पिलवंड ,राज्य प्रशिक्षक, प्रा.कैलास बोके, विदर्भ सचिव,रमेश भिसनकार,पुष्पाताई ससाने,संजय मडावी, शेषराव इंगळे, अनिल पेंदोर,राहुल सोयाम, तुकाराम जुमनाके, नागोराव गेडाम, रामेश्वर ढगे,तर प्रमुख पाहूणे म्हणून उत्तमराव पांडे,उमरखेड,विष्णू लसवंते,आर्णी,वसंत गव्हाळे,पुसद,राजेश ससाने,कारंजा,निलेश पिलवंड,ढाणकी हे उपस्थित होते.विविध तालुक्यातुन मेजर जीवन कोवे,यवतमाळ,संगीत पवार, दिग्रस,भागवत काळे,चंद्रकांत खंदारे, उमरखेड, काशिनाथ खरवडे, महागाव,निलेश उकंडे,आर्णी,शंकर पखमोडे,मंजली साखरकर, दारव्हा,गोलू वायले,मानोरा तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादाराव चिरंगे ,डॉ. गणेश वानोळे, अजय ढंगारे, प्रल्हाद साखरे, सुनील बोडखे,दिपक सरकुंडे, प्रकाश चिरंगे, अजय घावस आदींनी परिश्रम घेतले. संचलन दादाराव चिरंगे तर आभार अनिल पेंदोर यांनी मानले.










