अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 07 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील मस्जिद वार्ड क्रमांक 1 मधील चंद्रशेखर देविदास मेश्राम ते लक्ष्मण गंगाधर मेश्राम यांचे घरापर्यंत सिंमेट काॅन्क्रींट रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी, जिशान ज्ञानेश्वर मेश्राम, मनोहर राम मेश्राम, विनय नरेंद्र भालशंकर, कुलदीप दिपक मेश्राम, गोवर्धन मेश्राम व चंद्रशेखर देविदास मेश्राम आदींनी शासनाकडे केली आहे. तक्रारीच्या प्रती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी व कुर्ली येथील ग्राम विकास अधिकारी राजु जामुनकर आदींना दिले आहे.घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील मस्जिद वार्ड क्रमांक 1 मधील चंद्रशेखर देविदास मेश्राम ते लक्ष्मण गंगाधर मेश्राम यांचे घरापर्यंतचा रस्ता मागील 20 वर्षांपासून अतिशय खराब झालेला आहे. तसेच या रस्त्यावरुन ये जा करण्यासाठी नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर चंद्रशेखर मेश्राम यांचे घराजवळ पाणी साचत असते. या संदर्भात कुर्ली येथील ग्रामपंचायतीला अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र चंद्रशेखर मेश्राम ते लक्ष्मण गंगाधर मेश्राम यांचे घरापर्यंत सिंमेट काॅन्क्रींट रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मस्जिद वार्ड नंबर 1 मधील एका ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्याने तीन महिन्यांपूर्वी कुर्ली ग्रामपंचायतीला विनंती अर्ज दिला होता. मात्र, त्या अर्जावर अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी कुर्ली येथील मस्जिद वार्ड क्रमांक 1 मधील चंद्रशेखर देविदास मेश्राम ते लक्ष्मण गंगाधर मेश्राम यांचे घरापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करुन सिमेंट काॅन्क्रींट रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.