अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 07 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून शरद व कोपरी (कापसी) ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाली आहे. घाटंजी तालुक्यातील जांब येथील ग्रामपंचायत सरपंच पदी रमेश ईस्तारी सिडाम, पार्डी (जांब) येथील ग्रामपंचायत सरपंच पदी गिता राजु परचाके, शरद ग्रामपंचायत सरपंच पदी अमोल अनंतराव मडावी, राहाटी ग्रामपंचायत सरपंच पदी यमुना गुणवंत तुमराम, कोपरी (कापसी) ग्रामपंचायत सरपंच पदी भारती युवराज मरापे, कोळी (बुजुर्ग) ग्रामपंचायत सरपंच पदी कल्पना नामदेव मरापे, रामपूर ग्रामपंचायत सरपंच पदी नरसिंग चंपत पेंदोर, उंदरणी ग्रामपंचायत सरपंच पदी कविता देवदास पुसणाके आदीं सरपंच पदी निवडून आले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून घाटंजीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय साळवे, निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड, ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरोली मंडळ अधिकारी अनिल येरकार, शिवणी मंडळ अधिकारी यशवंत शिरभाते, कृषी पर्यवेक्षक राजेश चांदुरकर व घाटंजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिन राजुरकर आदींनी निवडणुकीत चोख कामगिरी बजावली आहे. घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल असे, जांब ग्रामपंचायत सदस्य – त्र्यंबक आत्राम, काशीराम कुळसंगे, चंद्रभागा किणाके, मनोहर गेडाम, मोहणी मडावी, सुमित्रा मडावी, रमेश सिडाम, कांताबाई कुडमते व संगीता चौधरी. पार्डी (जांब) – विट्ठल परचाके, सुनिता अभ्यनवार, वंदना सिडाम, चंद्रकांत कोवे, तानाबाई कोडापे, माया मडावी. शरद ग्रामपंचायत – जयराम कातले, जितेंद्र कांबळे, माया मडावी, सोनाली पेटकुले. राहाटी ग्रामपंचायत – किशोर लढे, संतोष गेडाम, निलेश तुमराम, यमुना तुमराम, वेणुताई राऊत. कोपरी (कापसी) ग्रामपंचायत – माधव मेश्राम, शकुंतला मरापे, निकीता सावरकर, संगिता मसराम, विनोद सोनटक्के, युवराज मरापे, रंजना वाघाडे. कोळी (बुजुर्ग) ग्रामपंचायत – मनोज मरसकोल्हे, शालु विनोद, किरण डफळे, अनुसया आत्राम, शिला देवतळे, कोरवते, चंद्रप्रकाश खरतडे. रामपूर ग्रामपंचायत – सुखदेव धुर्वे, सुरज अनाके, रुपाली धुर्वे, किरण मेश्राम, अश्विनी कणाके, प्रिती पाटील, योगीता धुर्वे. उंदरणी ग्रामपंचायत – अरुण किणाके, कविता पुसणाके, मंगला येणावत, अनिता पुसणाके, कल्याणी गावंडे, लहु पुसणाके, अमोल ठाकरे. चोरंबा ग्रामपंचायत – रेणुका आत्राम. मांडवा ग्रामपंचायत – चेतन कावले आदीं ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. एकंदरीत घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. या वेळी घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण लिंगाडे यांनी आपल्या पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता.


