प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुका विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने कायदेविषयक अक्कलकुवा येथील औधोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन दि. 07 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अक्कलकुवा न्यायलयाचे न्यायाधीश एस.एस.बडगुजर हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात मार्गदर्शन करताना सांगितले की,विधी सेवा प्राधिकरणाचे काम लोकांपर्यंत कायदा पोहोचवण्याचे आहे. युवकांनाही या कायद्यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. कायद्याच्या अज्ञानामुळे नकळत काही गुन्हे घडले तर तुमचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. सायबर क्राइममध्येही युवक अडकत आहेत. त्यामुळे युवक-युवतीमध्ये विविध कायद्यांबाबत ज्ञान वाढावे, जनजागृती व्हावी, यासाठी विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक जनजागृतीच्या उपक्रमांचे सतत आयोजन करीत आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश एस. एस.बडगुजर यांनी केले.मार्गदर्शन करताना ॲड.पी.आर.ठाकरे यांनी सांगितले की,कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची, भयाची, लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल, असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे म्हणजे रॅगिंग अशी याची व्याख्या कायद्यात करण्यात आली आहेत. यात अशा विद्यार्थ्याला चिडवणे, शिवीगाळ, धमकावणे किंवा त्याच्या खोड्या काढणे, किंवा मनाला टोचेल असे बोलणे; किंवा विद्यार्थी, सर्वसामान्यपणे जे कृत्य किंवा जी गोष्ट स्वेच्छेने करणार नाही असे कृत्य किंवा अशी गोष्ट त्यास करावयास सांगणे या कृतींचा समावेश करण्यात आला आहे. असे ही मार्गदर्शन करतांना सांगितले.
अक्कलकुवा तालुका विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ॲड. संग्राम पाडवी यांनी ‘सायबर लॉ व सायबर क्राईम’ या विषयावर सायबर क्राईम कसा वाढतोय तसेच सायबर क्राईम पासून आपण सगळ्यांनी कसे सावध राहिले पाहिजे. सायबर क्राईमवरील अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.ॲड.जितेंद्र वसावे यांनी वाहतूकीचे नियम या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲड.रुपसिंग वसावे यांनी केले व या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गट निर्देशक जी.डी.सामुद्रे, ॲड.फुलसिंग वळवी,ॲड.रामसिंग वळवी,ॲड.जेठ्या वळवी,ॲड. आर.डी. पाडवी,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम.एच.काळे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकुवा न्यायालय कर्मचारी मयुर पाटील, एस.के अहिरे, धिरसिंग वळवी, योगेश वसावे व औधोगिक प्रशिक्षण संस्थेचे जे.पी.मोरे, ए. सी.शिवपुजे, ए.एन वळवी, सी.जी.वळवी, पी.व्ही.वानखेडे , बी.आर.बागुल यांनी परिश्रम घेतले.