अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : दि – ७ नोव्हेंबर २०२३ रोजी पातुर तालुक्यात झालेल्या सर्व साधारण महिला पोट निवडणूक शिर्ला ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक सहाच्या पोट निवडणुकीमध्ये पातुर येथील मनमिळाऊ स्वभावाने ओळखले जाणारे, सर्वांच्या परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष सावत यांच्या पत्नी उषा संतोष सावत यांना २३९ मते मिळाले असून प्रतिस्पर्धी यांच्यापेक्षा ४२ मते अधिक घेऊन विजय झाल्या आहेत.प्रतिस्पर्धी हकीमाबी सैयद शेरअली यांना या पोट निवडणूकी मध्ये १९७ मते मिळाली असून शबाना बेगम मोहम्मद शफीक यांना १५५ मते मिळाली तर नोटा पाच मते तर शकुंतला संजय इंगळे यांना झिरो मते मिळाली.पोट निवडणुकी मध्ये एकूण ५९६ मतदान झाले होते. या लढतीमध्ये उषा संतोष सावत यांनी सार्वधिक मते घेऊन बाजी मारली आहे.


