कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद दि.६ .
पुसद शहरालगत असलेल्या धनकेश्वर ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक पाच तारखेला पार पडली. त्याचा निकाल आज दिनांक सहा रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत प्रथमच जनतेतून थेट सरपंचाची निवड करण्यात आली. सरपंच पदासह एकूण नऊ सदस्या पैकी तब्बल आठ सदस्य पदी काँग्रेस नेते डॉ.मोहम्मद नदीम यांच्या पॅनल चा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले असून डॉ. नदीम यांचे भाचे मोहम्मद सादिक जिया उलहक हे सरपंचपदी प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. प्रचंड गाजावाजा झालेल्या या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी डॉ. नदीम यांचे भाचे व मोहम्मद सादिक जिया उलहक यांनी माजी सरपंच मिलिंद कनोजे यांचा १२९ मतांनी दणदणीत पराभव केला. मोहम्मद सादिक यांना ३४३ तर मिलिंद कनोजे यांना २१९मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची १८०मते अपक्ष उमेदवार बेलाबाई चव्हाण यांना मिळाली तर वीस वर्षे सदस्य राहिलेल्या मुबारक निरबान यांना चौथ्या क्रमांकाची केवळ ७७ मते मिळाली. ते सदस्य पदावर सुद्धा पराभूत झाले. एकूण ९ उमेदवारांपैकी ८ उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले. मात्र एक उमेदवार केवळ एकाच मतांनी पराभूत झाला. विजयी उमेदवार याप्रमाणे – वार्ड क्रमांक १- धुमाळ शोभा १५२ सनी देशमुख २२८ काळे बेबीनंदा १३४ ,वार्ड क्रमांक २- शेख आदिल करीम १९०पुंडे सुनीता संजय २०२रेहाना नसरीन जिया उलहक २७९ वार्ड क्रमांक ३- श्रीमती मस्के १५३ सतीश पडघने ११६ तर विरोधी पॅनलचे एकमेव उमेदवार शिंदे यांना ११२ मते मिळाली. तर डॉक्टर नदीम पॅनलचे अच्युत धुमाळ यांना १११ मते मिळाली, केवळ एका मताने ते पराभूत झाले. काँग्रेस नेते डॉ. नदीम यांची अचूक व्यूहरचना आणि वेळोवेळी दिलेल्या आवश्यक त्या सूचना यामुळे या निवडणुकीतील विजय सुकर झाला. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच सरपंच पदाचे उमेदवार मोहम्मद सादिक यांचे व्यक्तिमत्त्व या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले.