उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी, तळोदा
तळोदा – काँग्रेसने मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर केला परंतु त्यांचा विकास केला नाही.सबका साथ सबका विकास हा मंत्र व त्या प्रमाणे हिंदू मुस्लिम असा भेदभाव न करता सगळ्यांना सर्व योजनांचा समान लाभ नरेंद्र मोदींच्या केंद्रातील सरकारने दिला. मुस्लिम बांधवांच्या सुख दुःखात भाजप नेहमीच सोबत राहीली व या पुढेही राहील असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केलं. तळोदा शहरातील बद्री कॉलनी येथे भाजप पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील विविध पक्षातील 200 मुस्लिम बांधवांनी तळोदा शहादा विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.या प्रसंगी विजय चौधरी पुढे म्हणाले की भाजप बद्दल खूप दिशाभूल केली गेली परंतु आता मुस्लिम बांधवांना कळून चुकलंय की तीन तलाक किंवा 370 कलम सारखे निर्णय हे मुस्लिम बांधवांच्या व महिलांच्या हितासाठी घेतले गेले भाजपच्या सरकारने मोफत रेशन घरकुल योजना यासारख्या जन कल्याणकारी योजनांचा लाभ देतांना हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष निलेश माळी,विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी,जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी,सौ सारिकाताई चौधरी,जिल्हा महामंत्री कपिल चौधरी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शानु बाई वळवी,तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी,शहराध्यक्ष गौरव वाणी, अल्पसंख्यांकआघाडी जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान ,निलाबेन मेहता,प्रा विलास डामरे,जिल्हा महिला उपाध्यक्ष काजल मच्छले,शिरीष माळी,माजी नगरसेवक विजय क्षत्रिय,कल्लू अन्सारी,अमानुद्दीन शेख,भाजप कार्यकर्ते अंबालाल साठे,संजय वाणी ,अनिल परदेशी,घनश्याम कलाल,प्रविण चौधरी इ. उपस्थित होते.या वेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांच्या वतीने जावेद टेलर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आमच्या समुदायातील ज्यांना भाजप आमचा शत्रू वाटतो, त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये सामील झालो आहे.शेकडो मुस्लिम बांधव या पक्षात सामील झाले असून मुस्लिमांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. आम्हाला पण मुली आहेत.आमच्या मुलींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक प्रकरणी उचललेली पावले पाहून आम्ही पक्षात सामील झालो यावेळी भाजप प्रवेशार्थी चे स्वागत करतांना जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी मुस्लिम बांधवांच्या भाजप वरील विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासित केले.यावेळी हाजी शेख शरीफ शेख सरदार , कलीम अन्सारी ,जावेद पिंजारी ,शकील अन्सारी, नासिर अब्दुल हमीद काझी, इम्रान इस्माईल,हाजी सरदार उमराव,बबलू शेख,साजिद हाजी सरदार, शेरखान पठाण,इम्रान शकील अन्सारी ,समद बेलदार,अरबाज सय्यद,माजिद हाजी सरदार इ सह 200 मुस्लिम बांधवांनी प्रवेश केला.कार्यक्रमाची सुरुवात कलामे पाक च्या दिलावत ने फैजान खाटीक यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास चौधरी यांनी तर सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले .
“”मुस्लिम बांधवांच्या पक्षप्रवेशाने आगामी नगरपालिका निवडणुकीत मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक1,2व 4 मधील समीकरणं बदलणार असून तेथील इतर पक्षीय नगरसेवकांना भाजप च्या आव्हानांना तोंड देणं मुश्किल होणार आहे””