दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेले शेवटचं टोक आणि अति दुर्गम भाग म्हणून ओळखल जाणारं गाव म्हणजेच बेहेडगाव येथे दि.०५ रोजी, झेप प्रतिष्ठानची आगळी वेगळी दिवाळी आदिवासी मुलांसोबत साजरी करण्यात आली. झेप प्रतिष्ठान चे अध्यक्ष विकास धनावडे यांच्या प्रयत्नांतून गेले पाच वर्षापासून जिल्हा परिषद शाळा बेहेडगाव येथील मुलांना विविध शालेय उपयोगी वस्तू दिल्या जातात त्यामध्ये वह्या,पुस्तकं,गाईड, पेन, स्टडी टेबल,कम्प्युटर लॅपटॉप,ड्रॉईंग बुक, ब्याग,सॅनिटरी पॅड,चप्पल,मुलांसाठी फटाके देत असते असा प्रकारे झेप प्रतिष्ठान शाळेतील मुलांची प्रगती व्हावी म्हणून प्रत्येक वर्षाला मुलांना आव्हान करून किल्ले बनवणे,इस्रो च्या धर्तीवर मुलांकडून रॉकेट, चांद्रयान आणि ग्रह तारे बनवून त्या बद्दल माहिती सांगण्यात येते त्याच मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात बक्षीस दिले जात.दिवाळी म्हटली की आनंदाचा सण तसेच गोड पदार्थ बनवून संपूर्ण कुटुंबाने एकत्र येवून खाणे अशी दिवाळी प्रत्येक घरात साजरी केली जाते. पण अशीच दिवाळी सर्वांच्या घरी साजरी होताना दिसून येत नाही, कारण आजही अशी गरजवंत कुटुंबे आहेत की त्यांच्या घरी अशी दिवाळी साजरी होत नाही.म्हणूनच झेप प्रतिष्ठान मधील सर्व मंडळी ही दिवाळी गेली पाच वर्षे बेहेडगाव मध्ये गोड दिवाळी साजरी करतात.तसेच कोविड-१९ काळात सुद्धा विविध प्रकारे कुटुंबाला लागणारे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या त्यामध्ये तेल,मीठ,हळद, तिखट, तांदुळ, डाळ,बिस्कीट, असा किट तयार करून प्रत्येक घराला देण्यात आला होता या वेळी गावातील प्रत्येक घराला फराळामध्ये चकल्या , फरसाण , लाडू, शंकरपाळ्या,आशा फराळ देण्यात आला व शाळेतील मुलांना शैक्षणिक किट ३००, नववी दहावी साठी पुस्तकांचा संपूर्ण संच ७६ मुलींसाठी सॅनिटरी पॅड ३००,बक्षीस म्हणून स्टडि टेबल-१० ,चप्पल-३०० ,फटाके -३०० देण्यात आलं.झेप प्रतिष्ठाण ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य सामाजिक संस्था आहे.कार्यक्रमासाठी उपस्थित झेप प्रतिष्ठान चे अध्यक्ष विकास धनावडे सर व त्याचा संपूर्ण ग्रुप गावातील प्रविण पिठोले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तरुण मित्र मंडळातील सचिन बुधर ,गंगा भोये,बाबन वड,विजय वरठा, अमकार चौधरी,परशू पिठोले, कैलास बुधर, मिथुन वाडकर, महिला मंडळ कली पिठोले, संगीता बुधर,सुशीला पिठोले आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.