अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला – सुधाकरराव नाईक कला व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय येथे दि. २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी ‘करिअर गायडन्स सेल व करिअर कट्टा’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘व्यवसाय मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस.पी.एम. महाविद्यालय, नांदुरा येथील वाणिज्य विभागप्रमुख, तथा बदलत्या काळातील व्यवसायांचे अभ्यासक प्रा. डॉ. राहुल माहुरे यांची उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत बोबडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संयोजन करिअर गायडन्स सेल व करिअर कट्टाचे समन्वयक प्रा. डॉ. भास्कर पाटील व सहसमन्वयक प्रा. डॉ. अनंत राठोड यांच्या संयोजनात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी काळाच्या मागणीनुसार व्यवसाय व रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत,तरच आपण येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो. हा काळ तंत्रज्ञानाचा, स्टार्टअप उद्योग व्यवसायाचा असल्याचेही त्यांनी अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट करून सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आज आपल्या पुढील मोठे आव्हान आहे, याचा सामना करण्याची सक्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत बोबडे यांनीही कालप्रवाहातील नव्या व्यवसायाच्या संधी याविषयी संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकत, कोरोना काळात आपल्या आपल्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या व्यवसायांची उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती समन्वयक प्रा. डॉ. भास्कर पाटील यांनी यांनी केले. करिअर कट्टा अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध ॲड ऑन कोर्सेसची माहिती अर्थशास्त्र विभाग प्रमुख सह समन्वयक प्रा. डॉ .अनंत राठोड यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. गजेंद्र वासनिक, प्रा.नितीन देऊळकर, प्रा. एन. एफ. चव्हाण,प्रा. डॉ. संगीता तिहीले, प्रा. डॉ. राधा मुरूमकर, प्रा. पद्माकर सदांशिव, प्रा . अर्चना बोचरे, प्रा. कल्पना तरवाडे, प्रा . ज्योती वानखडे, प्रा. संदीप कुऱ्हाडे, प्रा.योगेश चव्हाण, प्रा. संदेश गवारगुरु प्रा. विनोद इंगोले, प्रा. भारती चोखानी, प्रा. सौ. शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. प्रेरणा डाहाणे आणि आभार प्रा. राहूल वाधवानी यांनी केले.