उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा: तळोदा तालुक्यातील भवर या ठिकाणी ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेला युवकावर बिबटने हल्ला केल्याची घटना नुकतीच भंवर या गाव आज रोजी घडली आहे.भंवर तालुका तळोदा या गावी अविनाश हिरालाल वसावे वय २२ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी सकाळी ०७.३० ते ०८.०० च्या दरम्यान गेले होते.नेहमीप्रमाणे ऊसाला पाणी लावत होते.असे करत असताना अचानक बिबटने मागून येऊन त्याच्यावर जबरदस्त हल्ला चढवीला या हल्ल्यामध्ये तो जखमी झाला व तशा जखमी अवस्थेत पळत गावात येऊन घटनेची माहिती दिली त्यांनी स्वतःला कसे तरी वाचवले ही माहिती गावात सर्व दूर वाऱ्यासारखी पसरली. याची कल्पना भंवर येथील सरपंच श्रीकांत पाडवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अविनाश वसावे यांची भेट घेतली व घडलेल्या घटनेची विचारपूस केली व त्यांनी लागलीच तळोदा येथील वन विभागाला याबाबत कल्पना दिली. वन विभागाने ही तातडीने वनपाल वासुदेव माळी यांना त्या ठिकाणी पाठवून झालेल्या घटनेच्या चौकशी चे आदेश दिले. चौकशी करताना वासुदेव माळी व गावातील सरपंच श्रीकांत पाडवी उपसरपंच भरत पाडवी यांनी झालेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष घटनेची पाहणी केली व तातडीने अविनाश वसावे यांना तळोदा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.
चौकट
तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार बिबट्याच्या हल्ला माणसांवर होत असून यात मागील काळात काहींचे जीव गेले. बिबटया नरभक्षक होत आहे तरी वनविभागाने हलगर्जी पणा दाखवून कुठेच कारवाई केलेली नाही तरी वनविभागाने अश्या ठिकाणी पिंजरे लावून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.