अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
श्री गुरुदेवाच्या प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभातफेरी काढून महोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्र संतानी आपल्या कीर्तनातून अभंगातून समाजाला अध्यात्माची गोडी लावून दिली. साधनेच्या माध्यमातून खऱ्या ज्ञानाची ओळख अनुभवातून लोकांनसमोर मांडली. ग्रामगीते सारखा पवित्र ग्रंथ लीखान करून ग्राम सुधारणेच महत्व ग्रंथात नमुद केल आहे त्यानी केलेले कार्य स्मरनात रहाव म्हणून गावोगाव भजनी मंडळ राष्ट्रसंताचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याच काम भजनी मंडळे करीत आहेत. सामुदायीक प्रार्थनेत प्रभचे नाम घ्यावे प्रभुचे नामा पैकी कोणतेही तुम्हाला आवडेल ते नाम नीवडा व नाम जप करत रहाव . प्रभुचे नाम कशासाठी गायाचे तर ते त्या प्रभुतत्वाला मिळवण्यासाठीच आपण नाम स्मरण करत राहावे.असे सुचक उदबोध्दक संदेश संतानी तुम्हा आम्हाला दिला आहे.आज या कार्यात गावातील भजनी मंडळाचे सदस्य सर्वश्री भाऊरावजी शिरडकर,देवबन गोस्वामी,गजानन मिराशे बळीराम वानखेडे,अवीनाश घुसे,नागोराव पोटे,धोंडीराम शेळके,सतिश दुधे, प्रल्हाद दुधे,प्रकाश शेळके कुंडलीक भोंग,आनंता बोन्द्रे,व इतर भजनी मंडळातील सदस्यानी कार्यक्रमात सहभाग घेऊन महोत्सव साजरा करण्यात आला .


