अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
संघर्ष योद्धा माननीय श्री.मनोज
जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून जोरापूरचे माजी सरपंच श्री.अशोकराव देवढे व भायगावचे सरपंच श्री.राजेंद्र आढाव यांनी आमरण उपोषण सुरू करून अन्नपाण्याचा त्याग केला होता.परंतु काल मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांनी हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.त्यामुळे भातकुडगाव फाटा येथील आमरण उपोषण कर्ते यांना मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन हे उपोषण सोडण्यात आले.यावेळी संजय डोंगरे जयकुमार देशमुख पत्रकार मधुकर केदार जिल्हा प्रतिनिधी अहमदनगरसकल मराठा समाज व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


