परवेज खान
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा शहरातील सप्तपर्णी या बहरलेल्या वृक्षामुळे नागरिकांना एलर्जी निर्माण झाली आहे, शहरातील नागरिकांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी युवा टायगर फोर्स नगरपरिषद पांढरकवड्याच्या वतीने चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागात सप्तपर्णी वृक्षाला बहार आली आहेत, या बलरलेल्या वृक्षामुळे शहरातील नागरिकांना ऍलर्जी निर्माण झाली आहे. याबाबत शहरातील नागरीकांच्या समस्यांची दखल घेऊन माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी युवा टायगर फोर्सकडून नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दोन नोव्हेंबर रोजी स्थानिक नगर परिषद सभागृह चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन जिद्देवार, प्रमुख उपस्थितीत डॉ प्रमोद यादगिरवार, प्रा. सुजाता शेंडे, प्रा. विरांणी, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय तोडेसे, तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी, नरेश मानकर मंचावर उपस्थित होते. टायगर फोर्सकडून आयोजित केलेल्या चर्चा सत्रात सप्तपर्णी वृक्ष बद्दल नागरिकांना होत असणारी ऍलर्जी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सप्तपर्णीच्या होणाऱ्या दुर्गंधीमुळे ज्या नागरिकांना अलर्जी निर्माण झाली आहे याबाबत डॉ प्रमोद यादगिरवार यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना झाडाचे फायदे तसेच तोटे देखील आहेत, त्यामुळे सप्तपर्णी मुळे एलर्जी झालेल्या नागरिकांनी त्या वृक्षाच्या सानिध्यात जास्त वेळ राहू नयेत, सरसकट सर्वच नागरिकांना अलर्जी होत नाही, त्यामुळे संपूर्ण झाडांची वृक्षतोड करणे योग्य नाही असे मत डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजू मोटेमवार यांनी ज्या नागरिकांच्या घरासमोर सप्तपर्णी झाडे आहे त्यांनी नगरपालिकेची संपर्क साधावे जेणेकरून त्या वृक्षावर फवारणी करून देण्यात येईल असे आवाहन त्यांनी केलेले आहे. या चर्चासत्रात गावातील प्रतिष्ठित नागरिक, डाॅ असोसिएशन, विधीतज्ञ, व्यापारी संघटना तसेच युवा टायगर फोर्स चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक साजिद शरीफ यांनी उपस्थित नागरिक प्रमुख अतिथींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आहे.


