अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
करंजी: शेवगाव पाथर्डी तालुका दुष्काळ जाहीर करावा महसूल प्रशासनाने तातडीने राज्य सरकारला शेवगाव पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला कळवा, शेवगाव पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवा अशी मागणी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकारी प्रसाद साहेब तसेच तहसीलदार श्याम वाडकर साहेब व तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे साहेब यांची भेट घेऊन. महाविकास आघाडी तर्फे त्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर्षी शेवगाव पाथर्डी तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. या कमी पावसामुळे ऊस, कपाशी, तुर, फळबाग अशी पिके ७५ टक्के पावसामुळे उत्तरा कमी झाला आहे. पावसाळ्यात १५ गावांना पाणी टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू होता. दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारने पाथर्डी तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही. शेवगाव पाथर्डी हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. असे महसूल अधिकाऱ्यांनी राज्य शासनाला कळवावे, या प्रकारचे निवेदन शिवशंकर राजळे तसेच संजू भाऊ केदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे निवेदन देण्यात आले आहे. याचा जर राज्य सरकारने विचार केला नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये रस्ता रोको आंदोलन केले जाईल असे निवेदनात जाहीर केले आहे.