अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डेल मार्च काढण्यात आला. सकल मराठा बांधवांनी लाखोचे अतिशय शांततेने क्रांती मोर्चे काढले परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतली नाही, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील सराटी येथे उपोषणाला बसलेली मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. या कॅन्डेल मार्चमध्ये शाळेतील लहान मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच पुरुष मंडळीही सहभागी होते. यावेळी गावामध्ये आरक्षणाविषयी नारे देऊन जल्लोष करण्यात आला अनेकदा मागणी होऊनही मराठा आरक्षण न दिल्यामुळे व प्रत्येक वेळी समाजाची फसवणूक केल्यामुळे सरकारचा निषेध म्हणून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. होता हा कॅन्डेल मार्च बाळदी गावच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान येथून सुरू करून सर्व गावात फेरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान येथे समाप्त केला.