सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
रेल्वे मेल सर्व्हिस कार्यालय नाशिक रोड येथील उपअभिलेख अधिकारी श्री आर.के.साळी यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न झाला.भारतीय सेना डाक सेवा व रेल्वे डाक सेवा या विभागात तब्बल चाळीस वर्ष सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले.अत्यंत शांतता प्रिय आणि शिस्तप्रिय व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी पोस्टल विभागातील व रेल्वे विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाला पोलिस विभागातील आदरणीय प्रदीप गीते साहेब,पोस्ट अधिकारी जगदीश दुसाने साहेब,गिरणादुत चे संपादक,साहित्यिक व पत्रकार सुरेश पवार,आरएमएस चे वाणी साहेब,आरएमएस चे नवनियुक्त एसआरओ गावित साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.अनेक मान्यवरांनी साळी साहेब यांच्या सोबत आठवणीत राहिलेले क्षण सांगून सेवानिवृत्त प्रंसंगी गौरवपर मनोगत मांडले.संत निरंकारी मंडळ व मध्य रेल्वे राजभाषा हिंदी विभाग सचिव ज्ञानेश्वर पिसे यांनी मनोगत मांडताना साळी साहेबांचे आभार मानले व कविता आणि शेरो शायरी ने कार्यक्रमात रंगत आणली तसेच गीते साहेब,पत्रकार सुरेश पवार यांनी विविध कविता आणि चारोळ्या यांचा समावेश मनोगतात करून सेवानिवृत्ती समारंभास एक उंची प्राप्त करून दिली.आदरणीय श्री.रवींद्र साळी साहेब यांनी आपल्या आभाराच्या मनोगतात त्यांची सहचारिणी सौ.वंदनाताई यांचा विशेष उल्लेख करून मुलगी शिवानी व मुलगा शुभम यांच्या पारिवारिक सहकार्यामुळे चाळीस वर्षाची सेवा आधी वीस वर्ष घरापासून लांब आर्मी मध्ये आणि नंतर रेल्वे डाक सेवा करू शकलो याचा विशेष उल्लेख केला.अत्यंत सुंदर आणि कार्यक्रमाला साजेशी रांगोळी आरएमएस महिला कर्मचारी सौ.शारदा पिसे यांनी परिसरात काढली होती सोबतच मानाचा फेटा घालून त्यांनी आर.के.साळी साहेबांचा सत्कार केला.
या प्रसंगी आरएमएस कर्मचारी शिरोडे मॅडम, हारदिकर मॅडम,विठ्ठल भाकरे, सायकलिस्ट रमेश शेजवळ,आईनाथ सोनकांबळे यांनी देखील प्रासंगिक मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पांचाळ साहेब यांनी केले व आभार मानून सदर कार्यक्रमाची सांगता झाली.