प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१ नोव्हेंबर पाथरी येथे देवनांद्रा सर्कलमधील सर्व गावातील समाज बांधवांच्या वतीने पोखरणी फाटा पा येथे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे .या उपोषणास देवनांद्रा सर्कलमधील सर्व समाज बांधव शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत. अद्याप पर्यंत यांच्या या उपोषणाची दखल कुठल्याही अधिकाऱ्याने घेतलेली नाही. उपोषणा स्थळी भेट दिली असता आत्तापर्यंत समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत .जर सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल .असे यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजाच्या उपोषणास नानाविध संघटनांनी आप आपला पाठिंबा दिला आहे. विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ महाराष्ट्र राज्य पाथरी च्या वतीने व ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने व पंचमुखी हनुमान मंदिर सेवाभावी संस्था पाथरी, प्रकाश केदारे व वैभव मुळे, नितीन पाटील, योगेश बिडकर, मनोज केदारे, मकरंद पाठक, विजू गाजरे, या सर्व समाज बांधवांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला सदरील उपोषण शांततेच्या मार्गाने चालू आहे. जर सरकारने त्वरित मागणी मान्य जर नाही केली तर हेच साखळी उपोषण आमरण उपोषणात होऊ शकते या उपोषणासाठी देवनांद्रा सरकारमधील रेनापुर, पोहे टाकळी, देवनांद्रा, बोरगव्हाण, झरी, सिमूर गव्हाण, बांदरवाडा,देवेगाव या ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे.