प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी -दिव्यांगाचा 5% निधीत वाढ करून राहुरी शहरातील दिव्यांगांना कल्याणकारी योजना राबवणेत यावे दिव्यांग कल्याण विभाग स्वातंत्र्य मंत्रालयांचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था यांच्या वतीने राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. प्रत्येक वर्षी मिळणारा 5% निधी हा इतर नगरपालिकेच्या मानाने खूप तुटपुंजा मिळत आहे. महागाई खूप वाढलेली आहे, त्यामुळे दिव्यांगाना हा निधी पुरत नाही. राहुरी नगरपालिकेला उत्पन्नाचे स्रोत बरेच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्व उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप केला जातो. त्यामध्ये वाढ करून 40% ते 59 % पर्यंत आठ हजार 60% ते 79% नऊ हजार व 80% ते 100% असणाऱ्यांना दहा हजार देण्यात यावा त्याचबरोबर इतर नगरपालिके प्रमाणे 1) दिव्यांग स्वयंरोजगार अर्थसाह्य योजना 2) दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना 3) दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी दिव्यांगाच्या योजनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे. 4)UPSC /MPSC पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी खाजगी कोचीन क्लासेस मध्ये प्रशिक्षण मिळण्यासाठी अर्थसाहय मिळावे. 5) दिव्यांगाचे विवाहासाठी अर्थसहाय्य करणे 6) दिव्यांगाना प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत घरकुल पाण्यासाठी एक लाख रुपये अर्थसाह्य करणे 7) दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच गेली दोन वर्षापासून राहुरी नगरपालिका इमारतीमधील लिफ्ट बंद आहे. दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी वर जाण्या येण्यासाठी लिफ्ट त्वरित सुरू करण्यात यावे. वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास नगरपालिकेच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा उत्तर जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी मधुकर घाडगे यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष योगेश लबडे, शहराध्यक्ष जुबेर मुसनी, शहर कार्याध्यक्ष संजय देवरे, प्रहार सैनिक रामदास हुडे उपस्थित होते.