मनोज भगत
ग्रामीण प्रतिनीधी तेल्हारा
समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांचे यथार्थ चरित्र झी टॉकीजच्या माध्यमातून संपूर्ण जगभर सांगण्याचा सर्वात प्रथम विक्रम वाणीभूषण वीरवैष्णव श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केल्याबद्दल त्यांचा श्री वारकरी सेवा समिती, आकोट तर्फे गुणगौरव सोहळा तथा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. स्थानिक श्री संत नरसिंह महाराज मंदिर आकोट येथे सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ यांची सोमवार दि. ३०/१०/२०२३ रोजी कीर्तन सेवा आयोजित होती. कीर्तनानंतर श्री महाराजांचा छोटेखानी गुणगौरव सोहळा संपन्न झाला गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराज उपाख्य श्री ज्ञानेश्वरदास विरचित श्री संत गजानन महाराजांचे संपूर्ण चरित्र या ग्रंथामधून श्री वाघ महाराज यांनी झी टॉकीज वर सलग दहा दिवसातील दररोज ८५ मिनिटांच्या सत्रामध्ये श्रींचे दिव्यातीदिव्य चरित्र आपल्या प्रभावी वक्तृत्वातून मांडले त्या सोबतच विदर्भातील श्री संत भास्कर महाराज श्री संत नरसिंह महाराज श्री संत गौरीशंकर महाराज श्री संत गुलाबराव महाराज श्री संत पुंडलिक महाराज भोकरे श्री संत पुंडलिक महाराज जायले श्री संत वासुदेव महाराज आदी संतांचेसुद्धा चरित्र वर्णन त्यांनी यामधून केले. त्यांच्या या महान श्री गुरुसेवा कार्याबद्दल त्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ म्हणाले हा गुणगौरव माझा नसून श्री गुरु संत वासुदेवजी महाराज यांचा आहे. दोन दिवसांमध्ये सलग वीस तास चरित्र कथा सांगणे ही शक्ती माझी नसून माझ्या मुखातून श्री महाराजांनीच हे बोलवून घेतले. त्यांचे कृपा-आशीर्वाद असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले. प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्री नंदकिशोर महाराज झामरे यांनी तर प्रस्ताविक प्रा. श्री साहेबराव मंगळे व मनोगत श्री ज्ञानेशप्रसाद महाराज पाटील यांचे संपन्न झाले. याप्रसंगी वारकरी सेवा समिती आकोटची सेवेकरी व भक्तमंडळी उपस्थित होती. त्याचप्रमाणे श्री.ह.भ.प. अशोक महाराज जायले रमेशभाऊ हिंगणकर डॉ. सुहासराव कुलट सुरेश जाधव सेजपाल प्रदीपजी खोटरे विनोदभाऊ तळोकार निलेशभाऊ अवारे श्रीहरी बाविस्कर आदी मंडळींनीसुध्दा श्री महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.